Back to Top

Thursday, March 7, 2013

Saandhan Valley Trek



त्या दिवशी बहुतेक सोमवार असावा मी नेहमीप्रमाने नेट सर्फिंग करत होतो अचानक एक फोटो पाहून थांबलो....तो फोटो होता “सांधन valley चा” (Sandhan Valley).




दुसरया मिनटाला ठरवले कि आपलाल्या जायचे आहे सांधण valleyला .लगेच mail केला माझ्या group ला आणि अर्ध्यातासाच्या आत सगळयाचे replay आले “ कधी जायचे ?” आणि आम्ही next weekend ला सांधण valleyचा प्लान नक्की केला.
             मग सांधण valleyची मिलेले तेवढी माहिती काढाली...नेटवरून,मित्रांकडून. सांधण valley म्हणजे actually एक धबधबा आहे .पावसाळ्यात सांधण valleyतून जाणे अशक्य!!!! नोवेंबर-डिसेंबर नंतर valley तून खाली उतरता येते.
एक प्रोब्लेम लक्ष्यात आला...कि valleyत एका ठिकणी ६०-७० फुटी rock patch आहे ठीथे rappling करावे लागेल आणि आमच्याकडे rappling चे काही साहित्य नव्हते. नंतर समजले कि तिथल्या गावातील लोकांकडे rapplingचे साहित्य मिळेल.मग मिशन get set go>>>>
आंम्ही सगळे मिळून ११ मावळे होतो. तसे सांधण valleyला जाण्यासाठी खुप रस्ते आहेत पण आम्ही पुण्याहून जाणार होतो म्हणून पुणे - नारायणगाव – ओतूर - ब्राम्हणवाडा - राजुर – साम्रद हा route निवडला . आम्ही पहाटे ५:०० ला निघालो.नारायणगावला माझ्या घरी चाहा – नाशता केला.जवळपास ११:०० वाजता आम्ही भंडारदरा धरणा जवळ गेलो.थोडा वेळ थांबलो फोटोसेशन साठी.


भंडारदरा धरणाचा परिसर म्हणजे किल्ल्याची पंढरीच जणू. अलंग,मदन,कुलन,रतनगड,आजोबागड सगळे किल्ले इथेच. तसेच सह्यद्री पर्वतरांगांतील सर्वात उंच असे “कळसुबाई” शिखर हि इथेच.



संधान valley ला जताना वाटेत पांडवकालीन “अमृतेश्वर मंदिर” लागते.मंदिराचे कोरिवकाम अत्यंत विलोभनीय आहे.  








अमृतेश्वरच्या बाजूला रतनगड आहे.





  दुपारी २:३० वाजता आम्ही साम्रदला पोहचलो. या गावातून संधान valley ला सुरवात होते. साम्रद गावातून गाईड तुकाराम बरोबर घेतला आणि बरोबर दुपारी ३:०० वाजता valley उतरायला सुरवात केली.
valley त उतरण्याचा experience सुपर्ब होता.









valley मध्ये थोड्या अंतर गेल्यावर थोड्या वेळ पाण्यातून जावे लागते.एथेच भगवान घसरून पडला होता.


थोड्या अंतर गेल्यावर rappelling चा patch येतो.





आम्ही ५:०० वाजता त्या ६० फुटी rock patch ला पोहचलो.पण तिथे आमच्या आधीचा group अजून तो patch उतरत होता. तिथून १ वेळेस एकाच व्यक्ती उतरू शकत होती. त्यामुळे आम्ही थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरवले.थोडी भूकपण लागली होती.मग भेळेवर ताव मारला. पण आमच्या आधीच्या group ला खाली उतरायला संध्याकाळचे ७:०० वाजले. आता खरी मज्जा येणार होती.कारण आमच्या group मध्ये मी सोडून कोणीही rappelling केलेलं नव्हते आणि आता तर अंधार पडला होता.





 मग हळूहळू तो patch उतरायला सुरवात केली.सगळ्यांना उतरता उतरता ९ वाजून गेले.एकदा हा patch उतरला कि तुम्ही ७०% valley जिंकलात. पुढे १५-२० फुटाचे ३ patch आहेत .पण ते काही जास्त आवघड नाहीत.पण ते उतरताना वेळ लागतो.
रात्रीचे ११:१५ वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या पोहचलो.सगळ्यांनाच प्रचंड भूक लागली होती.जेवयाच्ही valley काहीही सोय नाही.साम्रदला जेवायची सोय आहे पण valley मध्ये मात्र तुम्हाला स्व्ततः जेवायची सोय करावी लागते. 





लगेच लाकडे गोळा केली आणि खिचडी बनवली. सगळे दमलेले असल्यामुळे लगेच आडवे झाले ते direct सकाळी उठायलाच.valley थंडी खुप वाजते. तेव्हा येताना पुरेसे अंथरूण घेवून या.




सकाळी उठलो....आणि सभोवतालचा sceen पहिला.....OMG....




            

 सगळ्यांना उठवले...दौंलातने पोहे बनवायला घेतले.रात्रीची 1st क्लास खिचडी त्यानेच बनवली होती. हॉटेल मनेगमेंतला जायचे सोडुन Software engineer झाला होता.




सांधण valley चे मावळे ..



पोहे संपवले आणि लगेच पुढे चालू लागलो.आता पुन्हा सांधण valley चढायची होती.पण रस्ता दुसरा होता.वर येताना समोर प्रचंड असा “आजोबागड” दिसतो.valley चढायला ३-४ तास लागतात पण येण्यःचा घाट काही अवघड नाही.



            


दुपारी १२ वाजता आम्ही साम्रदला पोहचलो.गावात जेवलो आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली...पावसाळ्यात परत येण्याचे पक्के करून....:)


आमचा गाईड :

नाव : तुकाराम बांडे
मो:९६८९४०९०९२,९३७२६८५६६०
संधान valley ला जायचे असल्यास शक्यतो आधी फोन करून जा.म्हणजे त्याला तुमची योग्य व्यवस्था करता येयील.
Happy Journey.
:)